शिक्षण संस्था
एक अशी स्वयंसेवी संस्था जी पालकांच्या मायेचे छत्र नसलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी अखंड परिश्रम करते. समाजाचे मूळ असलेल्या स्त्रीला लहानपणीच शैक्षणिक , मानसिक, शारिरीक व सामाजिक सहाय्य करून त्यांना संधीची दारे उघडी करून देते.
शिक्षित मुली
३ जानेवारी, म्हणजेच भारतातील पहिल्या महिला शिक्षिका “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांचा जन्मदिवस! अश्या शुभप्रसंगी अर्थात ३ जानेवारी २०२४ रोजी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या जन्मदिवसानिमित्त “आशा फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” ची स्थापना मुलींच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आली.
एका छोट्या गावातील मोजक्या शाळेपासून सुरुवात करून 2025 पर्यंत सातारा जिल्ह्यातील 50 हुन अधिक शिक्षण संस्था मधील 300 हुन अधिक शाळांमध्ये तसेच 3000 पेक्षा जास्त मुलींना मदत केली आहे.

शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या माध्यमातून एक आदर्श समाज घडवणे.
शिक्षणाचा मजबूत पाया घालून, त्याला कौशल्य विकास आणि अन्य आवश्यक घटकांची जोड देत, मुलींना त्यांच्या आयुष्यात सर्वोच्च स्थानी पोहोचवणे आणि त्यांच्या माध्यमातून एक आदर्श समाज घडवणे हेच ‘आशा फाऊंडेशन’चे मिशन आहे.
आत्मविश्वास निर्माण करणे, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, सर्वांगीण विकास, आत्मनिर्भरता आणि सक्षमीकरण ही आमची मूल्ये आहेत.
३ जानेवारी २०३१ पर्यंत, म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्वितीय जन्मशताब्दी वर्षांपर्यंत, महाराष्ट्रातील २ लाख विद्यार्थिनींपर्यंत पोहोचणे, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे आणि त्याद्वारे एक आदर्श समाज उभा करणे हे ‘आशा फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट’चे ध्येय आहे
आशा फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट
च्या माध्यमातून राबवले जाणारे
उपक्रम
श्री. दत्तात्रय जगताप यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील. लहानपणापासून शिक्षणाला प्राधान्य देऊन शालेय शिक्षण गावांमध्ये पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये आले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ आजी व मावशी ने केला अनेक अडचणींना सामोरे जात खडतर प्रवासातून मोठ्या जिद्दीने त्यांनी एमबीए शिक्षण पूर्ण केले.
सौ. रूपाली जगताप यांचा विवाह श्री. दत्तात्रय जगताप यांच्याशी झाला. आयुष्यातील अर्धांगिनी होऊन त्यांनी घरची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत असताना सौ. रूपाली जगताप यांनी घर गाडा व्यवस्थित हाकला. घरात कोणतीही अडचण येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली.
श्री. दत्तात्रय जगताप यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील. लहानपणापासून शिक्षणाला प्राधान्य देऊन शालेय शिक्षण गावांमध्ये पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये आले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ आजी व मावशी ने केला अनेक अडचणींना सामोरे जात खडतर प्रवासातून मोठ्या जिद्दीने त्यांनी एमबीए शिक्षण पूर्ण केले.
सौ. रूपाली जगताप यांचा विवाह श्री. दत्तात्रय जगताप यांच्याशी झाला. आयुष्यातील अर्धांगिनी होऊन त्यांनी घरची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत असताना सौ. रूपाली जगताप यांनी घर गाडा व्यवस्थित हाकला. घरात कोणतीही अडचण येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली. त्या स्वतः प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या व्यवसायात ही कार्यरत असून
आशा फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री. दत्तात्रय जगताप यांनी केली. या संस्थेचा मुख्य उद्देश निराधार मुलींना शिक्षण व मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आधार देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
सुरुवातीला फाउंडेशनची स्थापना सातारा जिल्ह्यातील लोणंद गावातून झाली. 2025 पर्यंत सातारा जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त शिक्षण संस्थांमध्ये 300 हून अधिक शाळांमध्ये आणि 3000 हून अधिक मुलींना मदत करण्यात आली आहे.
संपर्क करा:
फोन नंबर: +91 9372738170
ई-मेल पत्ता: connect@aashafoundationcharity.org
2030 पर्यंत महाराष्ट्रातील किमान दोन लाख मुलींना शिक्षण व मदतीच्या माध्यमातून सक्षम बनवण्याचे आशा फाउंडेशनचे ध्येय आहे.
Designed with ❤️ by Aasha Foundation Charitable Trust Team.
WhatsApp us