आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट

Intro
एक लहान मूल जेव्हा हळूहळू वाढत असते पहिल्यांदा पालथे पडायला शिकते, नंतर हळूहळू रांगायला शिकते, काही महिन्याचे झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहायचा प्रयत्न करते आणि उभे राहिल्यानंतर आपल्या आई-वडिलांच्या बोटाला धरून चालायला शिकते. एका नवजात शिशुला सर्वात प्रथम स्वतःच्या पायावर उभे राहून चालायला शिकवतात ते त्याचे आई-बाबा! बोटाला धरून संपूर्ण जग दाखवतात ते त्याचे आई-बाबा!
Image 2
पण जर एखाद्या निरागस मुलाला किंवा मुलीला जग दाखवण्यासाठी बोट धरून चालवण्यासाठी त्याचे आई-बाबाच नसतील? तर खरंच कल्पना करवत नाही..! त्यातही जर ती मुलगी असेल तर तिला स्वतःचे वडील सर्वात प्रिय असतात. पण पाठीवरती हात ठेवून शाबासकी द्यायला पालकच नसतील तर ती मुलगी किती हालअपेष्टा सोसत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही...
Image 3
लहानपणी आई-वडिलांच्या मायेचे छत्र हरवल्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक काटेरी प्रसंगावर मात करून उद्योग विश्वामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणारे नाव म्हणजेच श्री. दत्तात्रय जगताप! लहानपणापासून आई-वडील नसल्याने त्यांचे संगोपन आजी व मावशीने केले. जर एक मुलगी सक्षम बनली तर ती संपूर्ण घराची जबाबदारी घेऊ शकते असे लक्षात आल्यावर स्वतःला झालेल्या वेदना पुन्हा कोणाच्या आयुष्यात येऊ नये म्हणून निराधार मुलींसाठी ज्यांची दोन्ही पालक किंवा एक पालक नसलेल्या मुलींसाठी ‘आपण स्वतःहून काही केले पाहिजे' या संकल्पनेतून श्री दत्तात्रय जगताप यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंतीचे औचित्य साधून “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” ची स्थापना 3 जानेवारी 2023 रोजी केली.
Shapath
पालक नसलेल्या इयत्ता पाचवी ते दहावी मधील मुलींसाठी आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत असून श्री. दत्तात्रय जगताप व सौ. रूपाली जगताप हे प्रथम सेवक म्हणून कार्य करतात. फाउंडेशनच्या माध्यमातून मुलींचा मानसिक- शारीरिक- सामाजिक असा सर्वांगीण विकास व्हावा व शिक्षण घेऊन प्रत्येक मुलगी ही सशक्त व्हावी हेच उद्दिष्ट “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” चे आहे. फाउंडेशन तर्फे अनेक शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ज्यामध्ये शैक्षणिक साहित्य, मुलींच्या नावाची “मी लेक सावित्रीची” अशा आशयाची फोटो फ्रेम व भक्कम पाठिंबा देऊन प्रत्येक मुलीला सक्षम बनवले जाते.
Image 5
श्री दत्तात्रय जगताप यांनी स्वतःचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” ची सुरुवात केली. एका छोट्या गावातील मोजक्या शाळेपासून सुरुवात करून 2025 पर्यंत सातारा जिल्ह्यातील 50 हुन अधिक शिक्षण संस्था मधील 300 हुन अधिक शाळांमध्ये तसेच 3000 पेक्षा जास्त मुलींना मदत केली आहे. “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे महाराष्ट्र राज्यातील किमान दोन लाख मुलींना जानेवारी 2030 पर्यंत मदत करून सक्षम बनवण्याची ध्येय आहे ईश्वराच्या आशीर्वादाने व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने हे ध्येय साकार करू.
0 +

शिक्षण संस्था

0 +

शिक्षित मुली

प्रथम सेवक

Dattatray Jagtap
श्री. दत्तात्रय जगताप
प्रथम सेवक
आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट
श्री. दत्तात्रय जगताप यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे झाला. लहानपणापासूनच शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी शालेय शिक्षण गावातच पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात दाखल झाले. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे आजी आणि मावशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सांभाळ झाला.

अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी एमबीए शिक्षण मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. त्यानंतर मुंबईत अनेक छोटे-मोठे नोकरीचे अनुभव घेत स्वबळावर "EnggMech Innovations Pvt. Ltd." ही स्वतःची कंपनी स्थापन केली. व्यवसायातील चढ-उतार पार करत त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

या प्रवासात त्यांनी अनेक तरुणांना व्यवसायात मार्गदर्शन केले. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची दखल 'सह्याद्री वाहिनी' ने "झेप" या कार्यक्रमाद्वारे घेतली आणि त्यांच्यावर माहितीपट तयार केला.

'आपण समाजाचे देणे लागतो' या भावनेतून प्रेरित होऊन आणि 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या विचारांवर आधारित “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” ची स्थापना त्यांनी केली. आज ते स्वतः प्रथम सेवक म्हणून स्त्री शिक्षणासाठी कार्यरत आहेत.
Rupali Jagtap
सौ. रूपाली जगताप
प्रथम सेवक
आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट
सौ. रूपाली जगताप यांचा विवाह श्री. दत्तात्रय जगताप यांच्याशी झाला. त्यांनी आयुष्याची जबाबदारी स्वीकारत घर आणि संसार उत्तमरीत्या सांभाळला. व्यवसायातील अडचणींना सामोरे जात असतानाच त्यांनी कुटुंब आणि घर व्यवस्थित सांभाळले.

त्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे व्यवसायातही सहभागी आहेत. दोघांनी मिळून स्थापन केलेल्या "आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट" मध्ये त्या सक्रियपणे कार्यरत आहेत.

त्या फाउंडेशनचे विविध उपक्रम स्वतः जातीने लक्ष घालून पार पाडतात. घराच्या जबाबदाऱ्या पार पाडतानाच त्यांनी समाजकार्यालाही प्राधान्य दिले आहे.

"आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट" मधील प्रत्येक मुलींसाठी श्री. दत्तात्रय जगताप हे जसे वडील आहेत, तसे सौ. रूपाली जगताप या आई आहेत. त्या प्रत्येक मुलीच्या संगोपनाची जबाबदारी पूर्ण समर्पणाने पार पाडत आहेत.